धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात शेतीच्या कामासाठी आलेल्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीला तिच्या नातेवाईक असलेल्या महिलेने फूस लावून पळवून नेले. त्या महिलेने तिच्या नातेवाईक तरुणासोबत घेत दुचाकीवरून पळवून नेले, तसेच तिला दहा दिवस डांबून ठेवले. यावेळी त्या तरुणाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करून ही घटना कोणास सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पाळधी पोलिसांनी अनिल शिकाऱ्या ऊर्फ कालूसिंग पावरा (२३, वाकपाडा, ता. शिरपूर) याला अटक केली तर मीनाबाई सुकलाल बारेला ही महिला फरार आहे.
अटक करण्यात आलेल्या तरुणाविरोधात बाललैंगिक अत्याचारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई चोपडा विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि उद्धव ढमाले, सपोनि सचिन शिरसाट, वसंत निकम, योगेश सोनवणे, अर्जुन कुवारे, विशाल सोनवणे आदींनी केली आहे.