विजय पाटील : लाईव्ह महाराष्ट्र न्युज
रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील हे प्रबळ दावेदार होते तसेच त्यांच्याविषयी सहानुभूती देखील मोठी होती निवडून येण्याची दाट शक्यता होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही बाजारू लोकांमुळे रवींद्र पाटील यांचा घात झाला.
फैजपूर व मुक्ताईनगर हे केंद्रबिंदू प्रामुख्याने आहे. रवींद्र पाटील यांना उमेदवारी मिळाली तर आपला बाजार भरणार नाही या माईंड गेम ने फैजपूर येथील अनवरणे व चोपड्यातील बाबाने चाल खेडली. फैजपुर च्या अनवरच्या जोडीला रावेरचा काँग्रेसचा लोकप्रतिनिधी जॉईन झाला.
श्रीराम ही मालदार पार्टी असल्यामुळे मलिदास खाण्यासाठी सर्व मुंगळे एकत्र झाले. त्यात मुक्ताईनगरचे मागे राहिली नाही, रवींद्र पाटील यांचे एकदम खासम खास असलेले देखील वजनदार पाकिटामुळे दाबले गेले, रुईखेडा चांगदेव इच्छापुर अंतुरली मानमोळी येथील काहींनीदेखील मोठा पुढाकार घेतला रवींद्र पाटलांचे तिकीट कट करण्यासाठी तसेच रावेरळातील पद्माकर मार्फत देखील काही प्रसाद पुरवला गेला. तसेच राष्ट्रवादी युवक चा पदाधिकारी देखील मुंबईत रवींद्र पाटलांसोबत गेले आणि नेत्यांजवळ जय श्रीरामाचा घोष केला.
तसेच चोपडाच्या ललित ने देखील चांगलेच अंगात आणले होते. जळगाव शहरातील काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील रवींद्र भैय्यांच्या विरोधात जोर लावल्यामुळे उमेदवारी कट करण्यास नेत्यांना पुष्टी मिळाले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वसामान्य माणसांमध्ये बॅक फुटवर जावे लागणार आहे जय श्रीराम जोरात आहे परंतु दर्जीमुळे परेशान आहे अशी स्थिती मतदारसंघात असून बोदवड व मुक्ताईनगर तालुक्यात रवींद्र भैया समर्थकांमध्ये नाराजी असून सर्वसामान्य जनता पक्षात आलेले श्रीरामाला जागा दाखवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुक्ताईनगर बोदवड परिसरात श्रीराम यांचे स्वागत देखील कोणी तयार नाही काही बाजारू कार्यकर्त्यांचे खिसा गरम झाल्यामुळे ते देखील आता श्रीरामापासून दूर जायला सुरुवात झाली आहे असे या पक्षातील चित्र आहे.