प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतले पहिले वृत्तपत्र दर्पण चा पहिला अंक प्रकाशित झाला त्यानिमित्त 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील स्कूल कॅम्पस पाळधी येथे पत्रकार दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वृत्तपत्रांची पूजा करण्यात आली आणि विध्यार्थ्यांकळून वृत्तपत्राचे वाचन करवून घेण्यात आले. प्रसारमाध्यमांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका हे वृत्तपत्र निभावत असतात आणि वृत्तपत्रांना खऱ्या अर्थाने जिवंत करण्याचे काम आपले पत्रकार बंधू आणि भगिनी करतात. निर्भीड आणि प्रामाणिक कार्याचा आदर्श पत्रकारांच्या रूपाने आपल्या समोर येत असतो. त्यांच्या सन्मानाचा हा दिवस आणि त्याच पत्रकारांच्या ऋणात राहण्यासाठी जीपीएस परिवारातर्फे पत्रकार दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. यापूर्वीही दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अज्ञानावर ज्ञानाचा विजय या भावनेने पाळधी परिसरातील पत्रकारांचा सन्मान सोहळा जीपीएस परिवारा मार्फत राबवण्यात आलेला होता आणि आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस सोबतच वृत्तपत्रांची पूजा करून अनोखा असा पत्रकार दिन जीपीएस परिवारातर्फे साजरा करण्यात आला प्रसंगी भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी. डी. कंखरे सर त्याचप्रमाणे भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री योगेश करंदीकर सर तसेच भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य श्री सचिन पाटील सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सदर कार्यक्रमास उपस्थित होते.