जळगाव : प्रतिनिधी
घर खर्चासाठी पैसे मागितल्याचा राग आल्याने विवाहितेला शिवीगाळ करीत लोखंडी सळई डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याची घटना दि. २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील गुरुनानक नगरात घडली. याप्रकरणी संशयित पतीसह सासूविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दि. २० एप्रिल रोजी सकाळी विवाहितेचा पती कुणाल हा कामावरून घरी आला असताना विवाहितेने पतीकडे घरखर्चासाठी पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्याास नकार देत घरातील लोखंडी सळईने विवाहितेच्या डोक्यावर वार करीत गंभीर जखमी केले. यामध्ये विवाहिता गंभीर जखमी झाल्या असून, परिसरातील महिलांनी त्यांचे भांडण सोडविले. त्यानंतर विवाहितेला तत्काळ उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार घेतल्यानंतर विवाहितेने शनि पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार विवाहितेचा पती कुणाल चव्हाण व सासू गीता चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.