जळगाव : विजय पाटील
देशाचे नेते शरद चंद्र पवार यांचे मानसपुत्र म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र भैय्या पाटील यांना लोकसभा मतदारसंघात पोषक वातावरण असताना त्यांची उमेदवारी कट करण्यासाठी फार मोठे राजकीय षडयंत्र रचले गेले आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी हे षड्यंत्र उघडकीस आणलं परंतु त्यांचे बंड हे म्यान झाले आहे. परंतु निष्ठावंत रवींद्र भैयांना बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काही संबंध नसलेले श्रीरामाला ही उमेदवारी दिली गेली यामुळे बोदवड मुक्ताईनगर तालुक्यात असंतोष पसरला आहे.
राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी रवींद्र भैय्यांसाठी सुरुवातीला मेहनत घेतली त्यानंतर काही बाजारू लोकांना श्रीराम गवसला आणि तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. फैजपुर मधील अन्वर मार्फत ठाण्यात हा कट शिजला त्यानंतर मुक्ताईनगर मधील तिघांना भले मोठे वजनदार कागदी लिफाफा दिला गेला. प्रदेश पातळीवर देखील रसद पुरवली गेली. यावल येथील भैया साहेबांचा निष्ठावंत देखील फुटला तो मुंबईला भैया साहेबांसाठी गेला आणि मध्ये श्रीरामाचे नाव सांगितले. अशा अनेक सुरस राजकीय कहाण्या पुढे येत आहेत. चोपडाच्या बाबाने देखील नेहमीप्रमाणे भाजपला मदत व्हावी यासाठी श्री राम पुढे केला. कारण चोपड्याच्या बाबांना साहेबांनी काही नाही दिलं परंतु ते लोकसभेला जय श्रीराम करतात. रावेर येथील भक्त सोपान त्यांनी भैय्यासाहेबांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले परंतु घरच पोखरले गेले असल्यामुळे प्रयत्न निष्पर ठरले. तसेच जिल्ह्यातील काही नेत्यांनी देखील भैय्या साहेबांचे नाव पुढे केले आणि कोपऱ्यात श्रीराम योग्य कसा आहे याची राजकीय मांडणी केली. मुक्ताई भक्त भैय्यासाहेबांचा राजकीय घात जवळच्यांनीच केला. रावेरचे काँग्रेसचे नेते ही जबाबदार तेवढेच आहेत. या राजकीय खेडीमध्ये भैया साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि स्वतःचे खिसे फुल भरले असा प्रकार या मतदारसंघात झाला असल्याची चर्चा रंगली आहे. बोदवड व मुक्ताईनगर मध्ये आसंतोष निर्माण झाला असून यामुळे चांगलाच फटका बसणार आहे असे चित्र आहे.