चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील जाकीर हुसेन सोसायटीत एका तरुणाला शिवीगाळ करत चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना १७ रोजी घडली आहे या प्रकरणी २० रोजी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चौधरीवाडा परिसरात हुजेफा खान अब्दुल रहेमान (२३) हा तरुण वास्तव्याला आहे. त्याचा परिसरात राहणारा नावेद शेख मुशीस शेख हा नेहमी दारू पिऊन शिवीगाळ करत असतो. याबाबत हुजेफा खान याने नावेद शेख याच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. याचा राग आल्याने नावेद शेख याने हुजेफा खान याला अश्लील शिवीगाळ करत चाकूने वार करून गंभीर दुखापत केली.