लाईव्ह महाराष्ट्र न्युज : रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निष्ठावंतांना डावलून ऐनवेळी बाहेरचा उमेदवार लादला. उमेदवार श्रीराम यांच्या मॅनेजमेंटची धुरा दर्जी यांच्यावर सोपवले आहे परंतु चहापेक्षा किटली गरम असा प्रकार या मतदारसंघात झाला असल्याने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करीत आहे.
दर्जीचा वागणुकीचा फटका श्रीरामाच्या बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला पोषक वातावरण आहे परंतु सर्व काही पैशाने होत नाही यासाठी उमेदवारास जीवाभावाची टीम देखील आवश्यक असते. परंतु उमेदवार श्रीरामाच्या अवतीभवती दर्जीने कवच केल्याने कोणालाही काही उमजत नाही अशी परिस्थिती उमेदवाराच्या बाबतीत झालेले आहे. रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केले असून मिस मॅनेजमेंट मुळे रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवाराला मोठा धोका पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात देखील अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याने रुसवे फुगे सुरू झाले आहे. श्रीरामाच्या अवतीभोवती दर्जीपुराण असल्यामुळे अनेक राजकीय नेते लांब थांबणे पसंत करीत आहे अशी रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीची परिस्थिती आहे.