लाईव्ह महाराष्ट्र न्युज : विजय पाटील : देशात मोदी शहा यांच्या दंडलशाही विरुद्ध सर्व विपक्ष पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी याची नर्मितिी करण्यात आली या आघाडीमध्ये आम आदमी पार्टी सामील आहे. इंडिया आघाडी मार्फत 2024 लोकसभा एकत्रितपणे संपूर्ण देशात लढण्याचा नर्धिार करण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील 2024 लोकसभा एकत्रितपणे लढवण्यिाचे ठरले आहे. मात्र रावेर मतदारसंघात आम आदमी पार्टीला महाविकास आघाडी कडून बगल दाखवली जात आहे. रावेर मतदार संघात शरद पवार गटातील उमेदवार मा श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या अनुषंगाने आप चे जल्हिाध्यक्ष मिलिंद चौधरी व जल्हिा समन्वय योगेश हिवरकर यांनी सदच्छिा भेट घेऊन आम्ही आपला प्रचार प्रसार आप स्टाईलने करू व महाविकास आघाडीला बहुमतात निवडून आणण्याकरता मेहनत घेऊ असे आप कडून आश्वासित करण्यात आले.
मात्र जामनेर येथे झालेल्या मेळाव्यात शरद पवार साहेब उपस्थित असताना देखील आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना कोणालाही पदाधिकारी मेळाव्यात बोलावणे केले नाही. यामुळे आप कार्यकर्त्यान मध्ये रोष नर्मिाण होऊन जळगाव आप संभ्रमात गेली असल्याचे आप जल्हिा अध्यक्ष मिलिंद चौधरि यांनी प्रसारमाध्यमान जवळ खंत व्यक्त केली.