चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील अडावद येथील इंदिरानगर प्लॉट भागात राहणाऱ्या ४० वर्षीय इसमाने पत्नीला चाकूने भोसकले. तसेच मुलीवरही चाकूने वार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास येथील नेहरू चौकात घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, किरकोळ कारणावरून येथील शिवा नारायण कोळी (वय ४०, इंदिरानगर प्लांट भाग, अडावद, ता. चोपडा) याने आज सकाळी पत्नी अनिता शिवा कोळी (३५) व मुलगी माधुरी शिवा कोळी (२१) यांच्यावर चाकूने वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मुलगी माधुरी हिने दिलेल्या फिर्यादीवरून अडावद पोलिस ठाण्यात शिवा नारायण कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि संतोष चव्हाण आणि पोउनि राजू थोरात करत आहेत.