लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्हा कोरोना अहवालात दिवसात एकुण ४६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर एक बाधित रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले असून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
जळगाव जिल्ह्यात आत दिवसभरात एकुण ४६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर- १५, भुसावळ-२१, अमळनेर-२, धरणगाव-१, एरंडोल-३, रावेर-१, चाळीसगाव-३ असे एकुण ४६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आज दिवसभरातून जिल्ह्यात एक रूग्ण बरा होवून घरी गेला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाखप ४२ हजार ९५२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आता जिल्ह्यात एकुण १३६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.