चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वाघडू शिवारात शेतातील शेडमधून दोन क्विंटल कापूस चोरून तो विक्रीच्या तयारीत असलेल्या चौकडीला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेला दोन क्विंटल कापूस व दोन दुचाकी जप्त केल्या. त्यातील एक दुचाकी चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, वाघडू येथील शेतकरी सुरेंद्र दिनकर पाटील यांचे वाघडू शिवारात शेत आहे. शेतातील पत्री शेडमधून दि. ९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचा दोन क्विंटल कापूस चोरून नेला होता. तपासादरम्यान योगेश बेलदार यांना कापूस चोरीतील आरोपी हे स्थानिक असल्याची माहिती मिळाली. त्या दिशेने तपास केला. त्यावेळी त्यांनी संशयित आरोपी पांडुरंग रोहिदास गायकवाड (२७), प्रेम ठाकरे (१९), किरण निंबा बागूल (२३) आणि वाल्मीक कैलास मोरे (२०, चौघे वाघडू) यांना वाघडू शिवारातील शेतातून दि. १० रोजी सकाळी ताब्यात घेतले.