लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। राज्य शासनाच्या वतीने शासकीय व निमशासकीय कार्यालयात परिपत्रकानुसार महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देवून केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय व निमशासकीय कार्यालयात महापुरुषांच्या जयंत्या साज-या करण्यात येत असतात, परंतु नविन जीआर नुसार काही महापुरुषांची नवीन नावे समाविष्ट करण्यात आली आहेत, परंतु मागील वर्षी आमच्या निदर्शनास असे आले कि, कार्यालयाला सुटीचे दिवस असल्याने कर्मचारी, अधिकारी न येणे तसेच संबंधित महापुरुषांच्या प्रतिमा उपलब्ध नसने,या कारणांमुळे मागिल दोन,तीन वर्षे पासुन बरेच शे महापुरुषांची जयंती साजरी होत नाही असेआम्हाला स्थानिक पातळीवर निदर्शनास येत आहे,तरी हा महापुरुषांच्या अपमान आहे, असे न होता आपल्या स्तरावरुन तसे आदेश व्हावेत असे शिवसेना जळगाव जिल्ह्याचा वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेब तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे साहेब यांची भेट घेऊन लेखी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, महापौर जयश्री महाजन, उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील, विश्वनाथ पाटील, भडगाव तालुका प्रमुख भुरा पाटील, जवखेडे चे उपसरपंच विलास पवार हे उपस्थित होते.