• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पिंप्री शिवारात दोन वाहनांची धडक : चार जण जखमी

editor desk by editor desk
April 13, 2024
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

धरणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंप्री शिवारात दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी धरणगाव पोलिसात छत्रपती संभाजी नगर येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोलच्या माळी वाडड्यातील चालक लक्ष्मण मन्साराम महाजन (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ११ एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास पिंप्री ते चिंचपुरा दरम्यान वळण रस्त्यावर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील जैनोहीन कॉलनीतील दादाराव बाबूराव अहिरे याने आपल्या ताब्यातील अशोक लेलन्ड कंपनीची गाडी (एमएच- २०, ईएल- ७११८) ने भरधाव वेगात विरुद्ध दिशेने येणाऱ्या महेंद्रा पीकअप गाडी (एमएच- १९, बीएम- ३४५९) ला समोरुन जबर धडक दिली. त्यामुळे गाडी उलटून झालेल्या अपघातात उमेश देविदास धामने व रावसाहेब एकनाथ चौधरी यांना किरकोळ मार लागला. तर समोरच्या वाहनातील अहिरेसह त्याच्या गाडीतील एक जण जखमी झाला आहे. या प्रकरणी दादाराव अहिरे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनात स. फौ. राजेंद्र कोळी करत आहेत.

Previous Post

जिल्ह्यात दुहेरी हत्याकांड : पत्नीसह मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

Next Post

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा : जिल्ह्यात मोठे नुकसान

Next Post
राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा : जिल्ह्यात मोठे नुकसान

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा : जिल्ह्यात मोठे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group