• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यात दुहेरी हत्याकांड : पत्नीसह मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

editor desk by editor desk
April 13, 2024
in क्राईम, जळगाव, जामनेर
0
जिल्ह्यात दुहेरी हत्याकांड : पत्नीसह मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे अंगाचा थरकाप उडवणारी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. पती-पत्नीच्या आपसातील वादातून पतीने आपल्या पत्नीसह ११ महिन्यांच्या मुलीची हत्या केली व त्यानंतर दुधलगाव (ता. मलकापूर) येथे जाऊन विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली शुक्रवारी (दि. १२) या घटनेमुळे जामनेर तालुका हादरला असून, देऊळगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव गुजरी येथील पोलीस पाटील राजू इंगळे यांची कन्या प्रतिभा हिचा विवाह दुधलगाव येथील विशाल मधुकर झनके याच्याशी विवाह झाला होता. पतीला सुरुवातीला मद्याचे व्यसन असल्याने छोटी-मोठी कुरबुर व्हायची. परंतु, गेल्या काही काळात विशालने प्रतिभाचा मानसिक व शारीरिक छळ करणे सुरू केले. दोन लहान मुली व त्यातच पतीचे दारूचे व्यसन याचा त्रास असह्य झाल्याने गत चार महिन्यांपासून प्रतिभा पतीला सोडून ११ महिन्यांच्या मुलीसह माहेरी निघून आली होती. मध्यंतरी विशालने प्रतिभाची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला. परंतु, प्रतिभाने त्यास नकार दिला. शुक्रवारी देऊळगाव गुजरी येथे प्रतिभाचे आई-वडील शेतात गेले असताना विशाल पुन्हा प्रतिभाला नेण्यासाठी तसेच तिची समजूत घालण्यासाठी आला होता. प्रतिभाने त्याच्या सोबत जाण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण होऊन विशालचा राग अनावर झाला व त्याने धारदार शस्त्राने प्रतिभा आणि चिमुकल्या दिव्याची गळा कापून हत्या केली व तेथून फरार झाला. प्रतिभाच्या वडिलांना ही माहिती समजताच त्यांनी घरी धाव घेतली, त्यावेळी त्यांना आपली मुलगी प्रतिभा व नात दिव्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच जळगाव येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त, पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच फत्तेपूर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी देऊळगावकडे धाव घेतली. पत्नी व चिमुकल्या मुलीचा खून करून फरार झालेल्या विशालने दुधलगाव गाठले व कमरेला दगड बांधून गावातील एका विहिरीत उडी घेऊन त्याने स्वतःचेही जीवन संपविले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश फड व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.

 

Previous Post

धक्कादायक : कूलरचा शॉक लागल्याने १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

Next Post

पिंप्री शिवारात दोन वाहनांची धडक : चार जण जखमी

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

पिंप्री शिवारात दोन वाहनांची धडक : चार जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group