रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील चिनावल येथे बॅनर व झेंडे लावण्यावरून दोन गटांमध्ये वादात झाला. यावेळी झालेल्या दगडफेकीत सात जण जखमी झालेत. ही घटना सोमवारी ८ रोजी रात्री घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती लगेच नियंत्रणात आली.
सविस्तर वृत्त असे कि, ८ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास चिनावल बस स्टॅन्ड परिसरात पोलिस चौकीसमोर हा वाद झाला. यावेळी दगडफेकीत मयूर महाजन, संकेत महाजन, निर्मल महाजन, दिगंबर लोखंडे, जयेश इंगळे, चेतन नारखेडे, तेजस तायडे हे जखमी झाले आहेत. घटनास्थळी मुक्ताईनगर पोलिस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे, सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले आदींनी भेट दिली होती. जळगाव येथील दंगा नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले होते. दरम्यान चिनावल गावात तणावपूर्ण शांतता असून जनजीवन सुरळीत आहे.