• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गुढी पाडव्याचा दिवशी जळगावातील तरुणाचा खून !

पोलिसांनी चार संशयितांना घेतले ताब्यात

editor desk by editor desk
April 9, 2024
in क्राईम, जळगाव
0
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा मंगळवारी सकाळच्या सुमारास मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरीच्या संशयावरून त्याला परिसरातील चौघांनी असोदा शिवारात घेऊन जात बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (वय-35) असे मयताचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कांचन नगर परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंच्छी (वय-35) या तरुणाने शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात चोरी केल्याचा शेजाऱ्यांना संशय होता. मंगळवारी सकाळी चौघे दुचाकीवर बसवून ज्ञानेश्वर याला सोबत घेऊन गेले. दुपारी 2 वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर याचा मृतदेह असोदा शिवारात आढळला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती कळताच शनिपेठ, तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह ठसे तज्ञ आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहचली. पोलिसांनी लागलीच 4 संशयितांना देखील ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.

दरम्यान, घटनास्थळी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. मयताच्या अंगावर चटके दिल्याच्या खुणा असून हात आणि पायाला दुखापत केली असल्याचे दिसून येत आहे. मयत ज्ञानेश्वर याला दुचाकीवर बसवून चौघे घेऊन गेल्यानंतर काही वेळाने त्याचे कुटुंबीय तक्रार नोंदविण्यासाठी शनिपेठ पोलीस ठाण्यात गेले होते. पोलिसांनी 24 तास झाल्याशिवाय तक्रार घेतली जाणार नाही, तुम्ही परिसरात त्याचा शोध घ्या असे उत्तर दिल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, 2 मुले, 1 मुलगी असा परिवार आहे. जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी धाव घेतली असून मयताच्या नातेवाईकांशी चर्चा सुरू आहे.

Previous Post

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी, सामान्य निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक निश्चित

Next Post

विद्यार्थ्यांना मेहनतीला मोठे फळ मिळणार !

Next Post
विद्यार्थ्यांना मेहनतीला मोठे फळ मिळणार !

विद्यार्थ्यांना मेहनतीला मोठे फळ मिळणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group