एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील नागदुली येथील एका मजुराचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील नागदुली येथील समाधान साहेबराव महाजन (१९) हा मजूर खेडगाव तांडा येथे देवराम पवारस यांच्या घराच्या सेंट्रिंगचे काम करीत होता. त्यावेळी विजेचा धक्का लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान हा तीन वर्षांपासून सेंट्रिंग कामावर मजूर म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात वडील, आई, दोन बहिणी, दोन चुलते असा परिवार आहे. या परिवाराची घरची स्थिती हलाखीची असून मृत मुलगा हा एकुलता एक होता.