सावदा : प्रतिनिधी
राज्यभर उन्हाचा कडाका वाढत असल्याने अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतांना अशीच एक घटना सावदा शहरात लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजता घडली.
सविस्तर वृत्त असे कि, सावदा बस स्थानकाजवळ दुकाने आहेत. त्यातील एका गॅरेजमधून धुराचे लोट निघू लागले असता नागरिकांनी तिकडे धाव घेतली. तोपर्यंत आग शेजारील दुकानांमध्ये पसरण्यास सुरुवात झाली होती. सावदा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून ही आग विझवली. दरम्यान, या आगीत दोन्ही दुकानांमधील साहित्य जळून खाक झाले होते.
या ठिकाणी जवळपास २० दुकाने एकमेकांना लागून आहेत. मात्र, सुदैवाने आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठे नुकसान टळले. सावदा नगरपालिका अग्निशमन दलाचे अविनाश पाटील व त्यांचे सहकारी आणि नागरिकांनी प्रयत्नपूर्वक आगीवर नियंत्रण मिळवले. परिसरातील व्यापारी व नागरिक सरसावले आगीची मोठी घटना टळली.