Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जलतरण तलावात १५ वर्षीय मुलाला झटके आल्याने मृत्यू
    क्राईम

    जलतरण तलावात १५ वर्षीय मुलाला झटके आल्याने मृत्यू

    editor deskBy editor deskApril 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    शहरातील जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या १५ वर्षीय मुलाचा झटके आल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ऐन गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, अमन मनोहर निकम (१५, रा.चिंचखेडा, ता. चाळीसगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अमन हा पोहण्यासाठी आला. त्याने पाण्यात उडी घेतली. मात्र काही वेळात पाण्यातच त्याला झटके येत असल्याचे गार्ड मधुकर चौधरी यांच्या लक्षात आले. त्यांनी आवाज देत इतर गार्डच्या मदतीने अमनला बाहेर काढले आणि खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी तलावाचे व्यवस्थापक महेंद्र प्रल्हाद चौधरी यांनी फिर्याद दिली. त्यावरून चाळीसगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.