जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यासाठी स्वस्त धान्य दुकानातून दिव्यांग बांधवांना ३५ किलो धान्य वाटपाचे आदेश मिळाला असून दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व स्मरणपत्र देवून देखील न्याय मिळाला नाही. म्हणून बांधव्यांच्या हक्कासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग सेनेतर्फे उपोषण करण्यात येत आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाकडून दि.१ जानेवारी २०२१ पासून अध्यादेश काढण्यात आलेला असून सदरील अध्यादेशानुसार घरातील कुठल्याही दिव्यांग व्यक्तीचे शिधापत्रिकेत नाव असल्यास संबंधिताचे संपूर्ण कुटुंबाला ३५ किलो धान्य वाटप करण्यात यावे. असे असतांना जळगाव शहरातील व जिल्ह्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानादारांकडून सदरील अध्यादेशाची उघड-उघड पायमल्ली होत असून दिव्यांगांना त्यांच्या हक्काचे धान्यापासून वंचित ठेवीत आहेत. याबाबत संबंधित दुकानादाराशी विचारपूस केली असता ते सांगतात आम्हांला याबाबत माहितीच नाही, तसेच तुमचा कोठा आलेला नाही, सद्यस्थितीत तो शिल्लक नाही अशी उडवा-उडवीचे उत्तरे देऊन आम्हां दिव्यांग बांधवांची एक प्रकारे हेटाळणी करुन आमचेवर उघड-उघड अन्यायच होत आहे.
याबाबत दिव्यांग सेनेने जागतिक अपंग दिनी म्हणजे दि.३/१२/२०२१ रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दिव्यांग बांधवांसाठी त्यांना त्यांचे हक्काचे शासनाकडून आलेल्या आदेशानुसार प्रत्येक दिव्यांग बांधवास ३५ किलो धान्य मिळण्याबाबतचे योग्य त्या सूचना जिल्हा /तालुका पुरवठा शाखेचे अधिकारी वर्ग व सर्व शहरातील व जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांदाराना देण्यात याव्यात, तसेच त्यांना शासनाच्या अंत्योदय योजनेचे कार्ड मिळण्यात यावेत याबाबत देखील संबंधितांना सूचना व्हाव्यात असे कळविले होते, परंतु आमच्या मागण्याचा काहीएक विचार झाला नाही. त्यामुळे आज दिव्यांग सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव भरत जाधव, जळगाव जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, जिल्हा उपाध्यक्ष शे.शकील, जळगाव जिल्हा सचिव हितेश तायडे, मुकबधिर जिल्हाध्यक्ष भिमराव म्हस्के, शहर सचिव तोशीफ शहा, अल्पसंख्यांक अपंग जिल्हाध्यक्ष मुत्ताजीम खान, सादीक पिंजारी, नितीन सुर्यवंशी, ज्ञानेश्वर पाटील इ.बांधव उपोषणास बसले आहेत.