पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पारोळा तालुक्यातील एका गावातील महिलेला गेल्या दोन महिन्यापूर्वी समाधान रमेश पाटील याने छोटा सॅमसंग कंपनीचा मोबाईल वापरण्याकरीता दिला होता. त्यावर तो नेहमी महिलेशी बळजबरी संभाषण करत असे. तर ४ रोजी शेतात जात असताना या महिलेचा हात धरून त्याने शरीर सुखाची मागणी केली. यास महिलेने नकार दिला असता, त्याने महिलेचे काढलेले फोटो गावात व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी आज पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.