अमळनेर : प्रतिनिधी
नगरपालिकेच्या शेजारी खेळण्यांच्या एका दुकानाला आग लागून सुमारे ९ लाखांचे नुकसान झाल्याची घटना ४ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील संदीप राजेंद्र पाटील यांचे शिवसागर गिफ्ट सेंटर या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. घटना कळताच आजूबाजूचे दुकानदार आग विझवण्यासाठी धावले. आपआपल्या परीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन बंब बोलावण्यात आला अग्निशमन प्रमुख दिनेश बिन्हाडे, फारुख शेख फायरमन आनंदा झिंबल, मच्छिंद्र चौधरी, भिका संदांनशिव यांच्यासह नागरिकांनी आग विझवली. मात्र दुकानात मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने आतमध्ये प्रवेश करणेही अवघड होते. दुकानातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी, कॅमेरा सेट अप, भेटवस्तू असा सर्व एकूण ९ लाखांचे साहित्य जळून खाक झाले आहे. हवालदार अशोक साळुंखे यांनी पंचनामा केला.