जळगाव (प्रतिनिधी) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेचे दि.२३ ते २५ ऑगस्ट, २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. दि.८ जून २०२१ पासून दि.३१ जुलै, २०२१ पर्यंत झालेल्या (उन्हाळी) झालेल्या परीक्षांचे निकाल जाहिर झाले असून या परीक्षेमधील बहिस्थ लेखी व बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांना अनुपस्थित किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेच आयोजन करण्याच्या निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. बहिस्थ लेखी परीक्षा दि.२३ ते २५ ऑगस्ट, २०२१ या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या दरम्यान ऑनलाईन पध्दतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यु) स्वरुपात स्मार्ट फोन/ लॅपटॉप/डेस्क स्टॉप वेब कॅमेरासह याद्वारे घेण्यात येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी या कालावधीत विद्यापीठ संकेतस्थळावर देण्यात आलेल्या https://nmu.unionline.in या लिंकवर जाऊन परीक्षा द्यावयाची आहे. तसेच उपरोक्त कालावधीतील बहिस्थ लेखी परीक्षांमधील जे विद्यार्थी बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांना अनुपस्थित राहीले किंवा नापास झाले असतील अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष न बोलवता दि.२१ ऑगस्ट पर्यंत महाविद्यालयांनी ऑनलाईन पध्दतीने बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन करून त्यांचे गुण दि.२३ ऑगस्ट पर्यंत विद्यापीठात पाठवावे. या परीक्षांना ज्या विद्यार्थ्यांनी दि.८ जून ते ३१ जुलै,२०२१ पर्यंत झालेल्या परीक्षांसाठी परीक्षा अर्ज सादर केले असलेल्या विद्यार्थ्यांनाच या परीक्षेला प्रविष्ठ होता येईल. याबाबत काही अडचणी असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी अशी माहिती परीक्षा व मुल्यांकन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.किशोर पवार यांनी दिली.