जळगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथे प्रेमसंबंधातून एका ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार व नंतर तिचा खून करण्यात आल्याची घटना वरखेडे (ता. चाळीसगाव) येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत मेहुणबारे (ता. चाळीसगाव) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत एकास अटक करण्यात आली आहे. संजय धोंडा गायकवाड (३१, रा. वरखेडे खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बुधवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान गावालगतच्या खडक्या नाल्यात शौचासाठी गेली होती. ती लवकर घरी परत न आल्याने मुलांनी तिचा शोध घेतला. त्यावेळी गिरणा नदीपात्रात वाळूमध्ये अर्धवट पुरलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिस पाटील संतोष तिरमली यांनी मेहुणबारे पोलिसांना माहिती दिली. पंचनामा केला असता महिलेच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत महिलेच्या दिराने आढळला. दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसात भादंवि कलम ३०२, ३७६, ३२४ व २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.