चोपडा : प्रतिनिधी
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचे पथक व स्थानिक पोलिसांनी मंगळवारी न. प.च्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यात ४ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी लक्ष्मण बावीस्कर (४०, पंचशीलनगर, चोपडा), खुशाल बावीस्कर (४८ कोळंबा, ता. चोपडा), अजय माळी (२२ लोहीया नगर, चोपडा), वाल्मिक शिंदे (वर्डी, ता. चोपडा), अमोल जैन (३८ पंकजनगर, चोपडा), हिरालाल बाविस्कर (४३ कोळंबा, ता. चोपडा), सागर पाटील (१९, बुधगाव, ता. चोपडा), प्रवीण बावीस्कर (४०, कोळंबा, ता.चोपडा), प्रदीप महाजन (५३, अडावद, ता. चोपडा) अनिल लोहार (४७, चोपडा), सुधाकर सोनवणे (३८, गौतमनगर, चोपडा), आकाश कोळी (२०, कुरवेल, ता. चोपडा), योगेश भोई (२२ होळनाथे ता. शिरपूर) यांना ताब्यात घेण्यात आले तर इतर पळून गेले. त्यांच्याकडून ४ लाख ३४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत चोपडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे..