प्रतिनिधी प्रविण पाटील । जळगाव तालुका शेतकरी सल्लागार समितीची पहिली सभा मंगळवारी ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील कृषी कार्यालयात बैठक घेण्यात आली.
ही बैठक समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला जळगाव तालुका समिती सदस्य विलास पाटील, चंद्रकांत पाटील, नामदेव बिऱ्हाडे, नंदु पाटील, संजय माले, जितेंद्र पोळ, नारायण चव्हाण, जिजाबाई सोनवणे, संगीता बोंडे, सुरेखा देशमुख, निर्मला चव्हाण तसेच इतर सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी पोकरा या योजनेबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी आत्मा योजनेअंतर्गत समितीचे कार्याबाबत उपस्थित सर्व सदस्यांना माहिती दिली. या बैठकीला मंडळ कृषी अधिकारी मनोहर जंगले तसेच जळगाव तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नरेंद्र पाटील हे उपस्थित होते. या बैठकीत आत्मा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत चर्चा होऊन अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी जास्तीत जास्त युवक शेतकरी व महिला बचत गटांचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन यांवर भर देणार असल्याचे भावना व्यक्त केली.