यावल : प्रतिनिधी
यावल ते फैजपूर रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ अचानक दुचाकीने सोमवारी दुपारी पेट घेतला. सुदैवाने प्राणहानी टळली.
सविस्तर वृत्त असे कि, मनीषा संजय महाजन (४०, रा. फैजपूर) या आपल्या दुचाकीने १ रोजी दुपारी ३ ते ३:३० वाजेच्या दरम्यान यावलकडून फैजपूर येथे जात असताना सांगवी पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर दुचाकी अचानक जाम झाली. यामुळे थांबून पाहणी करीत असताना दुचाकीने अचानक पेट घेतला व जळून खाक झाली. यावेळी जवळच असलेल्या रसवंती चालकाच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. दुचाकी धावत असताना आग लागली असती तर इजा पोहोचू शकली असती. दरम्यान अचानक पेटलेली दुचाकी पाहून या मार्गावरुन येणारे जाणारे वाहनचालकही थांबून घडला प्रकार पाहत होते. वाढत्या उन्हात दुचाकी जास्तच गरम झाल्यामुळे हा प्रकार घडला असावा, असा अंदाज आहे.