• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘त्या’ खून प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेप

editor desk by editor desk
April 2, 2024
in अमळनेर, क्राईम, जळगाव
0
‘त्या’ खून प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेप

अमळनेर : प्रतिनिधी

चोपडा येथील प्रियकर व प्रेयसी अशा दोघांच्या खून प्रकरणी पाच आरोपींना अमळनेर सत्र न्यायालयाने जन्मठेप तर वकिलासह दोघांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अमळनेर येथील न्या. पी. आर. चौधरी यांनी सोमवारी हा निकाल दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश संजय राजपूत (२२, रा. रामपुरा, चोपडा) व वर्षा समाधान कोळी (२०, रा. सुंदरगढी, चोपडा) अशी मृत प्रियकर आणि प्रेयसीची नावे आहेत. १२ ऑगस्ट २०२२ रोजी चोपडा येथे खुनाची घटना घडली होती. घटनेच्या दिवशी राकेश हा वर्षा हिला पळवून नेण्याचा प्रयत्न करत असताना परिसरातील काही जणांनी त्यांना मोटारसायकलने वराड रस्त्यावर नेले. तिथे एका अल्पवयीन मुलाने गावठी पिस्तूलने राकेशच्या डोक्यात गोळी घातली. राकेश तडफडत असताना या मुलाने प्रतिकार करणाऱ्या वर्षाचाही गळा दाबला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हा मुलगा स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाला होता.

अॅड. नितीन पाटील याने पुरावे नष्ट करण्याचा सल्ला दिला. रवींद्र कोळी याने जिवंत काडतुसे लपवली तर पवन माळी याने कपडे जाळून पुरावे नष्ट केले होते. ही बाब पोलिसांच्या चौकशीत उघड आली सरकारी वकील अॅड. किशोर बागुल यांनी तब्बल २१ साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी आर. के. गढरी, मनोज पाटील, एका हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज, आरोपी यांच्या आपसातील वकिलाशी संवाद याबाबतचे सीडीआर रिपोर्ट ग्राह्य धरत न्या. चौधरी यांनी ही शिक्षा ठोठावली. यात तुषार आनंदा कोळी (२३), भरत संजय रायसिंग (२२), बंटी उर्फ शांताराम अभिमन कोळी (१९), आनंदा आत्माराम कोळी (५६) आणि रवींद्र आनंदा कोळी (२०) या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली.

Previous Post

पत्नीला न्यायला आलेल्या पतीला तुंबळ मारहाण

Next Post

दुचाकी व ट्रॅक्टरची धडक : दोन गंभीर जखमी

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

दुचाकी व ट्रॅक्टरची धडक : दोन गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group