जळगाव : प्रतिनिधी
माहेराहून दोन लाख रुपये आणावे, अशी मागणी करत तसलीनबी शेख जाबाज (२१) या विवाहितेच्या तोंडात मुंग्या मारण्याचे औषध टाकून सासरच्या मंडळींनी तिला मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवार, २९ मार्च रोजी घडली. या प्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, उस्मानिया पार्क येथील माहेर असलेल्या तसलीनबी शेख यांचा विवाह जळगावातीलच जाबाज शेख सलीम याच्याशी झाला. माहेराहून दोन लाख रुपये आणावे, अशी मागणी विवाहितेकडे केली जाऊ लागली. विवाहितेने पैसे आणले नाहीत म्हणून पती जाबाज शेख आणि सासू समन्नुख शेख यांनी शिवीगाळ व मारहाण करत विवाहितेच्या तोंडात मुंग्या मारण्याचे विषारी औषध टाकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच सास सलीम शेख, जेठ जुनेद शेख, दीर, आणि नणंद यांनीदेखील शिवीगाळ करत छळ केला. या प्रकरणी विवाहितेने शनिवार, ३० मार्च रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.