फैजपूर : प्रतिनिधी
आमोदा येथे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री जुगारावर धाड घालून दोघांना ताब्यात घेतले. मेहबूब नबाब तडवी व तुषार दिनकर चौधरी (दोघ रा. आमोदा) अशी आरोपींचे नावे आहेत. दोघांकडून २६३० रोख व जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमोदा-बामणोद येथे गेल्या काही दिवसापासून सट्टा जुगार जोरात सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाल्याने शुक्रवारी रात्री आमोदा बसस्थानकाच्या जवळ टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या सट्टा जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धाड घातली. यात सट्टा घेताना मेहबूब तडवी याला ताब्यात घेतले यावेळी तुषार चौधरी जुगार खेळविताना आढळून आला. स्थानिक गुन्हा शाखेचे महेश महाजन यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनी नीलेश वाघ करीत आहे.