रावेर : प्रतिनिधी
रावेर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभियंता असलेले संजय पंडित ब्राह्मणे यांना उमेदवारी संजय ब्राह्मणे जाहीर करण्यात आली आहे.
रविवारी पक्षाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भातील घोषणा केली. ब्राह्मणे हे बी. ई. सिव्हिल झाले आहेत. ते नंदुरबार येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. मूळचे धुळे येथील रहिवासी असलेले ब्राह्मणे हे सध्या भुसावळात वास्तव्यास आहेत. भुसावळ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सन २०१४ मध्ये शिवसेनेकडून विधानसभा निवडणक लढविली होती