जळगाव प्रतिनिधी । क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नुतन मराठा महाविद्यालयात सोमवार ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते प्राध्यापक प्रबोधिनीच्या ‘कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा’ या उपक्रमाचा सुरूवात करण्यात आले.
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पणासह विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी व्यासपीठावर नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख, कवयित्री, लेखिका पुष्पा साळवे, संगीत विशारद विशाखा देशमुख, कमलिनी बचत गटाच्या किरण वनकर, अॅड. बोरसे उपस्थित होते.
हा उपक्रम ३ ते १२ जानेवारी दरम्यान सुरू राहणार असून, यात क्रांतिज्योती सावित्रीबाई ते राजमाता जिजाऊ यांच्यासह महाराणी येसूबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी, बहिणाबाई चौधरी, ताराबाई मोडक, रमाबाई आंबेडकर, इंदिरा गांधी, कमला भसिन, सिंधुताई सपकाळ यांचा समावेश आहे. अशी माहिती नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख यांनी दिली.