Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विसनजी नगरातील दुकानात चोरी करणाऱ्या तिघांना अटक; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल
    क्राईम

    विसनजी नगरातील दुकानात चोरी करणाऱ्या तिघांना अटक; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील विसनजी नगरातील एका दुकानातून ७ हजार रूपये किंमतीचे कलरच्या बादल्यांची चोरी प्रकरणी तीन जणांना मुद्देमालासह अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अकाउटंट विजेंद्र श्रावण सोनवणे, हेमंत महादू सोनवणे रा. रामेश्वर कॉलनी, आणि रफिक पिंजारी असे अटक केलेल्या संशयित तिन्ही आरोपींची नावे आहे.

    याबाबत माहिती अशी की, कल्पेश प्रवीणचंद्र वेद (वय-५०) रा. विसनजी नगर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. विसनजी नगरातील राजेश टेन्ट हाऊसच्या गल्लीत असलेले श्रीनाथजी एजन्सी नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानावर हेमंत महादू सोनवणे रा. रामेश्वर कॉलनी हा दुकानावर नोकरी करतो. २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दुकानावर काम करत असतांना हेमंत सोनवणे व त्याच्या सोबत असलेला अनोळखी व्यक्ती यांनी संगनमताने मिळून ५ हजार रुपये किमतीचा कलरचा प्रायमर आणि २ हजार रुपये किमतीचे कलर्स प्लास्टिकचे बादली असा एकूण ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.

    गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोकॉ महेंद्र पाटील, पोलीस नाईक गणेश पाटील, पोलीस नाईक सलीम सुभान तडवी, पोकॉ रवींद्र साबळे, विकास पहूरकर, समाधान पाटील, विनोद पाटील यांनी संशयित आरोपी अकाउटंट विजेंद्र श्रावण सोनवणे, हेमंत महादू सोनवणे रा. रामेश्वर कॉलनी, आणि रफिक पिंजारी यांना अटक केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.