• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ट्रक चालकाला मारहाण करून लुट करणाऱ्या पाच संशयितांना एलसीबीकडून अटक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 2, 2022
in क्राईम, जळगाव
0
ट्रक चालकाला मारहाण करून लुट करणाऱ्या पाच संशयितांना एलसीबीकडून अटक

जळगाव प्रतिनिधी । वाकोद शिवारातील वाघुर नदीच्या पुलाजवळ ३० डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ट्रक आडवून चालक व क्लिनरला लुटणाऱ्या पाच संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी पहूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, ३० डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वाकोद शिवारातील वाघुर नदीच्या पुलाजवळून जळगावच्या
दिशेने रिकामी ट्रक (एमएच १९ सीवाय ६३८६) येत होती. त्यावेळी दोन मोटार सायकलवर आलेल्या अज्ञात लुटारूंनी ट्रक अडविला
ट्रकचालक व क्लिनर या दोघांना त्यांनी मारहाण करत त्यांच्याजवळ असलेले २ मोबाईल जबरीने हिसकावून पसार झाले होते. याप्रकरणी
पहूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यातील अज्ञात आरोपी हे रिकाम्या ट्रकलाच अडवून लुट करत असल्याबाबत अभ्यास केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाला
सुरूवात केली. . तपासाअंती त्यांच्या असे लक्षात आले की भाग्यश्री पालीमर्स, उमाळा या कंपनीच्या ट्रकचालकांकडे माल रिकामा
केल्यानंतर त्यांच्याकडे मोठया प्रमाणात मालाचे रोख पैसे असतात. त्यामुळे या रिकाम्या ट्रकला त्यांनी आपले टार्गेट केले असावे अशी
पोलीस तपास पथकाला शंका आली. त्या दृष्टीने तपास करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. अमोल देवढे, पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोना किशोर
ममराज राठोड, पोना रणजित अशोक जाधव, पोना श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, पोकॉ विनोद सुभाष पाटील, पोकॉ ईश्वर पंडीत पाटील,
चापोकॉ मुरलीधर सखाराम बारी या पथकाने लुटलेल्या रिकाम्या ट्रकच्या कंपनीस भेट देवून तेथे काम करणा-या कामगारांची माहिती
घेतली. तोंडापुर व वाकोद परिसरातील ट्रक चालकांची गोपनिय माहिती काढण्यात आली. त्यानुसार काही संशयीत इसमांचे फोटो प्राप्त
करण्यात आले. ते फोटो फिर्यादीस दाखवले असता त्यातील एका इसमास फिर्यादीने ओळखले. पो.नि. किरणकुमार बकाले यांनी खबरी
नेमून त्यांना फिर्यादीने ओळखलेल्या अज्ञात आरोपीचा फोटो दाखवत पुढील तपासाला सुरुवात केली. फिर्यादीने ओळखलेला इसम व
त्याचे साथीदार असे गोद्री ता.जामनेर गावावरुन फत्तेपुरच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पथक फत्तेपुरच्या दिशेने रवाना
केले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी फत्तेपुर येथे सापळा रचत संशयीतासह एकूण पाच साथीदारांना ताब्यात घेतले.
त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. त्यांनी गुन्हयांत हिसकावून चोरी केलेले सोळा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल काढून दिले.

Previous Post

दहिगाव येथे तरूणीची विष घेवून आत्महत्या; यावल पोलीसात घटनेची नोंद

Next Post

शासकीय रुग्णालयाच्या आवारात जनसंपर्क कक्षाला सुरुवात

Next Post
शासकीय रुग्णालयाच्या आवारात जनसंपर्क कक्षाला सुरुवात

शासकीय रुग्णालयाच्या आवारात जनसंपर्क कक्षाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group