Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हातात तलवार घेवून फिरणाऱ्या तरूण जेरबंद; एमआयडीसी पोलीसात गुन्हा
    क्राईम

    हातात तलवार घेवून फिरणाऱ्या तरूण जेरबंद; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 2, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : । तालुक्यातील रायपूर फाट्यावर हातात तलवार घेवून दहशत माजविणार्‍या तरूणाला एमआयडीसी पोलीसांनी रविवारी दुपारी अटक केली. त्याच्या ताब्यातील तलवार जप्त करण्यात येवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    समीर शहा शरीफ शहा वय २० रा. रायपूर, कुसूंबा ता.जि.जळगाव असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांना रायपूर फाट्यावर २० वर्षीय तरूण हा तलवार घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, हेमंत कळस्कर, योगेश बारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, सिध्देश्‍वर डापकर, चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने कारवाई करत तलवारीसह संशयित समीर शहा याला कुसुंबागावाजवळील फाट्याजवळ अटक केली. त्याच्या ताब्यातील ५०० रूपये किंमतीचा तलवार हस्तगत केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल सतीश गर्जे यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.