• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

editor desk by editor desk
March 27, 2024
in क्राईम, धरणगाव
0
धरणगाव : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

धरणगाव : प्रतिनिधी

सुखनाथ महाराजांचा दर्शन घेवून परतणाऱ्यांच्या दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता धरणाव चोपडा रस्त्यावर घडली. या अपघातात युवराज काशिनाथ महाजन (वय ५०, रा. विखरण, ता. एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले मच्छिंद्र सिताराम पाटील (वय ५०, रा. विखरण) हे गंभीर जखमी झालेल्यांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील वर्डी येथे सुखनाथ महाराजांचा भंडार असल्याने एरंडोल तालुक्यातील विखरण येथील युवराज महाजन व मच्छिंद्र पाटील हे (एमएच १९, ४४९०) क्रमांकाच्या दुचाकीने गेले होते. कार्यक्रम आटोपून ते माघारी येत असतांना धरणगाव चोपडा रस्त्यावरील जी.एस.ट्रेडिंगजवळ अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात युवराज महाजन यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले मच्छिंद्र पाटील हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, गोपाल पाटील अमोल चौधरी, गौतम सोनवणे, विनोद रोकडे, गजानन महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मच्छिंद्र पाटील यांना तात्काळ उपचारार्थ धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह पसार झाला होता.

अपघात झाल्यानंतर विठ्ठल तुळशीराम महाजन धरणगाव पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय करीम सैय्यद हे करीत आहे.

Previous Post

भरधाव बसची कारला धडक : दोन ठार तर १४ प्रवासी जखमी

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group