चाळीसगाव : प्रतिनिधी
भरधाव बसने कारला दिलेल्या धडकेनंतर झालेल्या भीषण अपघातात कारचालकासह दोघे जागीच ठार झाले, तर १४ प्रवासी जखमी झाले. हा अपघात देवळी गावानजीक मंगळवारी दुपारी घडला. काही जखमींवर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दोन गंभीर रुग्णांना धुळे तर एकाला मालेगाव येथे हलवण्यात आले आहे. शरद वासू माळी (३२) व शेख रेहमान शेख बाबू (४०, दोन्ही मालेगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव आगाराची बस क्रमांक (एमएच १४ बीटी ०३७५) ही • मंगळवारी दुपारी चाळीसगाववरून मालेगावकडे सुसाट वेगाने जात असताना देवळीजवळील वळणावर कार (एमएच ०४ सीटी २४९२) वर समोरून आदळली. अपघातात कार चालकासह एका तरुणाचा मृत्यू झाला. तवेरातील ९ तर बसमधील पाच प्रवासी जखमी झाले. त्यातील काही रुग्णांवर चाळीसगाव येथे उपचार सुरु आहेत, तर अन्य दोघांना धुळे सामान्य रुग्णालयात व एकाला मालेगाव येथे हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. सपोनि संदीप परदेशी व सहकाऱ्यांनी मदतकार्य सुरू केले. दरम्यान, कारमध्ये ११ प्रवासी होते तर बसमध्ये २६ प्रवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली बसचालक मनोहर अभिमन देसले याचा शोध सुरु असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
एसटी व कार अपघातात धुळे येथे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची नावे अशी: जयवंत नारायण माळी (२२, सावतावाडी), सुनील पवार (२५, मालेगाव), भरत माळी (२८, सावतावाडी), हरिजन पवार (२०, मुंगसे), संदीप तुळशीराम माळी (१९, मुंगसे), मोतीराम माळी (१९, मुंगसे). चाळीसगाव येथे उपचार घेत असलेले रुग्ण- रमाबाई पद्माकर पाटील (३२, टाकळी), निशा चव्हाण (२६, चाळीसगाव), द्वारकाबाई दिलीप निकम (५२, पाडोळदे) दिलीप नथू निकम (६२, पाडोळदे), सुमनबाई भास्कर माळी (५९, पातोंडा), पद्माकर चिंतामण पाटील (६०, शिरसगाव