लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. ग्रामपंचायतीने आपली कुटुंब प्रमुखाची जबाबदारी समजून गावात कोणताही बालक कुपोषित बालक राहू नये या भावनेतून रविवारी २ जानेवारी रोजी गावातील १० कुपोषित बालके दत्तक घेवून त्यांना सदृढ बनविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या वतीने आदीवासी भागातील बालकांसह कुपोषित बालकांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. परंतू सर्वच योजना गरजूंपर्यंत पोहचन नसल्याने आपण गावाचे कुटुंब प्रमुख असल्याची भावना ठेवून गावातील काही कुपोषित बालकांना दत्तक घेवून त्यांनी सुदृढ बनविण्याचा उपक्रम हाती घेण्याच्या कामासाठी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. यावेळी गावातील १० कुपोषित बालके दत्तक घेतले आहे. या बालकांचा शारिरीक विकास व्हावा यासाठी विविध पोषक वस्तू पालकांना देण्यात आले. याप्रसंगी सरपंच हिलाल भील, उपसरपंच सकुबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रावण ताडे, शशिकांत अस्वार, रामकृष्ण काटोले, विनोद बारी, मुदस्सर पिंजारी, गौतम खैरे, द्वारकाबाई बोबडे, भागाबाई बारी यांच्यासह गावातील अंगणवाडी सेविका व प्रतिष्ठित नागरीक शेनफडू पाटील, मिठाराम पाटील, भगवाना बोबडे, गोकूळ बारी, भगवान सोनार आदी उपस्थित होते.