चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील सत्रासेन गावाच्या हद्दीत अज्ञात इसम अवैधरीत्या गावठी पिस्तूल (कट्टा), जिवंत काडतुसे घेऊन जात असल्याची गुप्त खबर मिळाल्यावरून चोपडा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत शनिवारी रात्री उशिरा एका आरोपीला 5 अटक केली आहे. त्याच्याकडून कट्टा, काडतूस, बुलेट आणि रोख रक्कम असा मिळून १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित दिवाकर वाघमारे (२४, माळीचिचोरे, ता. नेवासा, जि.अहमदनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. रोहित हा गावठी कट्टा आणि ३ जिवंत काडतुसे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली असता सापळ लावण्यात आला. त्याच्याकडून त्यास २५ हजार रुपय किमतीचे गावठी पिस्तूल, ३ हजान रुपये किमतीची तीन जिवंत काडतूसे दीड लाख रुपये किमतीची बुलेट गार्ड आणि रोख १ हजार रुपये असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोकॉ. पवन पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात चोपड ग्रामीण पोस्टेला. गुन्हा दाखल् करण्यात आला आहे. तपास पोहेको राकेश पाटील करीत आहेत.