लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव तालुक्यातील भादली येथील ३५ वर्षीय तरूणाने रविवारी २ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे उघडकीला आली आहे. नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भागवत अशोक फेगडे (वय ३५, रा. भादली) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली येथील भागवत फेगडे हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. फेगडे हे पेट्रोल पंपावर काम करुन उदरनिर्वाह करीत होते. रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगून भादली रेल्वेस्थानक परिसरातील रेल्वे खंबा क्रमांक ४२८/२ जवळ धावत्या रेल्वेसमोर झोकुन देत आत्महत्या केली. काही वेळातच परिसरातील नागरीकांनी मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता. यावेळी कुटुंबिय व नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी करुन आक्रोश केला.