यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसाड या गावात रविवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास पाच जण उमेश एकनाथ धनगर यांच्या पान टपरीत चोरी करत असल्याचे नागरिकांचे निदर्शनास आले. यावेळी नागरिकांनी आरडाओरड करून टपरीकडे धाव घेतली असता चार जण पसार झाले तर फैजान उर्फ दानिश खान अरिफ खान (वय १९, रा. तांबापुरा, जळगाव) याला नागरिकांनी पकडून पान टपरीत बंद केले.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक धारदार चाकूसह एक हत्यार, मोटरसायकल व एक मोबाइल असा ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या तरुणाने व त्याच्या साथीदारांनी गोकूळ नेवे उर्फ छोटूबाबा यांच्य घरातूनदेखील साहित्य चोरी केल्याच समोर आले आहे.
याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदी ठाकूर, सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्य मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंद तडवी करीत आहे