• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खर्दे येथे पत्नीच्या डोक्यात लाकूडाचा वार करून खून; पतीला अटक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 2, 2022
in क्राईम, धरणगाव
0
खर्दे येथे पत्नीच्या डोक्यात लाकूडाचा वार करून खून; पतीला अटक

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खर्दे येथे पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पतीला धरणगाव पोलिसांनी अटक केली असून पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठाबाई नामदेव जाधव रा. कुशेळावाडी ता. मानगाव जि.रायगड हल्ली मुक्काम खर्दे तालुका धरणगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, विठाबाई जाधव ह्या पती नामदेव रामा जाधव यांच्यासह वास्तव्याला आहे. खर्दे येथील विट भट्टीवर काम करून उदरनिर्वाह करतात. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विठाबाई जाधव या घरी असताना पती नामदेव जाधव याने विट भट्टीसाठी कोळसा व गवत आण असे सांगत होता. त्यावेळी पत्नी ही दारू पिली असल्यामुळे त्याला दारूच्या नशेत शिवीगाळ करत होती. याचा राग आल्याने रागाच्याभरात नामदेव जाधव याने जवळ पडलेला लाकडी दांडा उचलून विठाबाईच्या डोक्यात व चेहर्‍यावर मारून तिला बेशुद्ध केले. दरम्यान जखमी अवस्थेत नामदेव जाधव यांनी पत्नीला साप चावल्याचा बनाव करून रुग्णालयात दाखल केले होते. चेहऱ्यावरील घाव व मारहाण याचा प्राथमिक अंदाज पाहून पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी नामदेव जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी संशयित आरोपी नामदेव जाधव याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहे.

Previous Post

जिल्हा रूग्णालयात अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

यावल-फैजपूर रोडवरील हॉटेलजवळ गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरूणाला अटक; यावल पोलीसात गुन्हा दाखल

Next Post
यावल-फैजपूर रोडवरील हॉटेलजवळ गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरूणाला अटक; यावल पोलीसात गुन्हा दाखल

यावल-फैजपूर रोडवरील हॉटेलजवळ गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरूणाला अटक; यावल पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group