धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील आनोरे येथील विवाहित महिलेने पती व सासू, सासरे यांच्या जाचास कंटाळून गुरुवारी सकाळी ८ वाजता आनोरे शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात कौतिक भिका पाटील यांच्या फिर्यादीवरुन पतीसह सासू, सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल संतोष पाटील (वय ३४) असे मयत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, धरणगाव तालुक्यातील अनोरे येथील संतोष पाटील यांचे धुळे जिल्ह्यातील वाडीभोकर येथील शीतल पाटील यांच्याशी विवाह झाला होता. दरम्यान, वाडीभोकर येथील माहेर असलेल्या शीतल पाटील या विवाहितेचा सासरच्यांनी सन २०१३पासून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ सुरु ठेवला होता.
या जाचाला कंटाळून अनोरे येथील संतोष दगा चौधरी यांच्या शेता (गट नंबर ३०२) मधील विहिरीत २१ मार्चला सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास शीतल पाटी यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी कौतिक भिवसन पाटील यांच्या फिर्यादीवरून शीतल यांचा पती संतोष हिरामण पाटील, सासू राजकोरबाई हिरामण पाटील व सासरे हिरामण अभिमन पाटील यांच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीम सय्यद करत आहेत. दरम्यान, मयत विवाहितेचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणला होता. या वेळी संतप्त झालेल्या विवाहितेत्या माहेरच्या लोकांनी शीतल पाटील यांचे पती संतोष पाटील याला चांगलाच चोप दिला. या वेळी काहींनी मध्यस्थी केल्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, मृत शीतल पाटील यांच्यावर आनोरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.