• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सहा दुचाकी, दोन संशयित ; दुचाकी चोरणारे ताब्यात

editor desk by editor desk
March 22, 2024
in Uncategorized
0
सहा दुचाकी, दोन संशयित ; दुचाकी चोरणारे ताब्यात

जळगाव : प्रतिनिधी

कामानिमित्त स्थायिक झालेल्या चोरट्याने दुचाकी चोरुन तो मध्यप्रदेशात कमी किंमतींमध्ये त्याची विक्री करणाऱ्यांचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. मात्र यातील मुख्य संशयित अद्याप फरार असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील खंडवा येथील संशयित कामानिमित्त एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास होता. शहरातील विविध भागातून तो दुचाकी चोरुन नेत मध्यप्रदेशातील पिपलोद येथे त्या दुचाकी कमी किंमतीमध्ये आपल्या साथीदारांच्या मदतीने विक्री करीत होता. दरम्यान, या संशयितांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी लांबवल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक तयार करुन कारवाईसाठी खंडवा येथे रवाना केले. या पथकाने खंडवा कारागृहातून अनोप धनसिंग कलम (कोरकु) (वय १८, रा. सुकवी, जि. खंडवा) व अंकीत सुकलाल ठाकूर (कोरकु) (वय २२, रा. मुसाखेडी इंन्दौर, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दरम्यान, पथकाने त्या दोघांकडून जळगावातून चोरी केलेल्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

या पथकाची कारवाई
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोउनि दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, गफूर तडवी, पोना सुनिल सोनार, विकास सातदिवे, योगेश बारी, छगन तायडे यांच्या पथकाने केली.

Previous Post

गंभीर गुन्ह्यातील चार जणांची टोळी हद्दपार

Next Post

सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची संपविले आयुष्य

Next Post
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !

सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची संपविले आयुष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group