Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रोकडे येथे लग्नातून साडेसहा लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबविले
    क्राईम

    रोकडे येथे लग्नातून साडेसहा लाखाचे दागिने चोरट्यांनी लांबविले

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 1, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। चाळीसगाव तालुक्यातील रोकडे येथे लग्नासाठी आलेल्या दाम्पत्याचे सुमोर ६ लाख ४९ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीला आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत माहिती अशी की, पंढरीनाथ गंगाराम पाटील (वय-५१) रा. गोंडगाव ता. भडगाव जि.जळगाव ह.मु. उल्हासनगर जि. ठाणे हे चाळीसगाव तालुक्यातील रोकडे येथील धनराज उत्तम पाटील यांच्या घरी लग्नाच्या निमित्ताने १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आले होते. लग्न आटोपून ते धरणगाव तालुक्यातील एका नातेवाईकांकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीचे साडेसहा लाखाचे २७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एका बँगमध्ये ठेवले होते. ते दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. यासंदर्भात त्यांनी शोधाशोध केली परंतु दागिने मिळून आले नाही. याबाबत पंढरीनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश चव्हाण करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.