लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय महिलेला एकाने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी ३५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबीयांसह राहते. गावातील गणेश भागवत मोहिते याने ३१ डिसेंबर रोजी रात्री १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान महिलेच्या घराच्या खिडकीतून आत आला. संशयित आरोपी गणेश भागवत मोहिते (वय-३२) हा महिलेला चाकूचा धाक दाखवून महिलेला तिच्या घराच्या खिडकीतून बाहेर ओढत नेले. घराच्या बाजूच्या बांधकाम चालू असलेल्या घराच्या रूममध्ये घेऊन तिला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी गणेश भागवत मोहिते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी भारत काकडे करीत आहे.