पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शेतात नेत वेळोवेळी अत्याचार करून गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यात एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला शेतात नेवून लग्नाचे अमिश दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेऊन तिला गर्भवती केल्याचा प्रकार उघडकीस आला असून आरोपी नाना बारकू सोनवणे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे .