जळगाव : प्रतिनिधी
येथील शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात दिनांक १८ मार्च २०२४ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या IQAC कक्षाद्वारे जळगाव शहरातील कला, वाणिज्य, विज्ञान, महाविद्यालयातील सर्व शिक्षकांकरिता नव्याने लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या यशस्वी अंमलबाजवणी करीता एक दिवसीय परिसंवाद आयोजन करण्यात आले.
या परिसंवादाचे उदघाटन डॉ. भरत अमळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी तज्ञ मार्गदर्शक प्रा. डॉ. दीपक दलाल, प्रा. पवित्रा पाटील (सदस्य, व्यवस्थापन परिषद), श्री. प्रमोद बऱ्हाटे (संपादक, साईमत), श्री. संजय शाह (Member, CAIT), प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रमोद चौधरी व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. पी. आर. चौधरी (सचिव, धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी, जळगाव) हे उपस्थित होते. डॉ. प्रमोद आर. चौधरी प्रभारी प्राचार्य, शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय यांनी प्रास्ताविक सादर केले.
डॉ. भरत अमळकर यांनी शिक्षण व औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण कुठे आहोत याचे वास्तविक उपस्थितांसमोर मांडले व या संदर्भातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे महत्व विषद केले. प्रा. पवित्रा पाटील यांनी NEP-2020 बाबत विद्यापीठाची भूमिका मांडली. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये NEP-2020 मुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याना Internship महत्व कळेल व व्यवसायाभिमुख शिक्षण मिळेल असे विषद केले. परिसंवादास विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सह्भाग नोंदवला.
आपल्या तज्ञ मार्गदर्शनात प्रा. डॉ. दीपक दलाल (क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी बाबत माहिती देतांना मागील व नवीन शैक्षणिक धोरण यांच्यातील फरक, तसेच शिक्षणासाठी निर्माण झालेल्या वाटा व संधी बाबत माहिती दिली. यासोबतच महाविद्यालयांनी आणि शिक्षकांनी स्वत: आपल्या वैयक्तिक संबंध उपयोगात आणून विद्यार्थ्यांना Internship मिळणेसाठी विविध औद्योगिक संस्थांसोबत सामंजस्य करार करून घाव्येत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका बऱ्हाटे यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले.