लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ येथील आ. संजय सावकारे यांची कार परस्पर परिवहन मंत्र्यांच्या नावावर ट्रान्सफर झाल्याचा प्रकार उघडकीला आला होता. याबाबत आ. सावकारे यांची आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांकडे तक्रार करु चौकशीची मागणी केली होती. याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या फिर्यादीवरुन जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची (एम.एच.१९-सी-झेड-५१३०) या क्रमांकाची टोयोटा कंपनीची अलिशान गाडी २१ डिसेंबर ते २७ डिसेंबर रोजी परिवहन विभागाच्या पोर्टलवर अनधिकृतपणे प्रवेश करीत बनावट स्वाक्षरी, बनावट कागदपत्रांच्या आधारावर चक्क परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्स्फर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शुक्रवार ३१ डिसेंबर रोजी आमदार संजय सावकारे यांनी आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडे तक्रार केली होती. याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी केलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तींविरोधात शनिवार, ३१ डिसेंबर रोजी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.