• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खा.खडसेंच्या उमेदवारीला विरोध ; कार्यकर्त्यांचे राजीनामे

editor desk by editor desk
March 19, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य, रावेर
0
खा.खडसेंच्या उमेदवारीला विरोध ; कार्यकर्त्यांचे राजीनामे

भुसावळ : वृत्तसंस्था

रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे भाजपच्या खासदार आहेत; पण भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या जास्त मदत करतात, असा आरोप करीत वरणगावसह परिसरातील २०५ भाजप कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याकडे पाठविले आहेत.

वरणगाव येथील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख व सुपर वॉरियर यांची बैठक रविवारी झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. भाजपतर्फे रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. याविरुद्ध तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामध्ये यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. तसेच भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगरातही याचे लोण पोहचले आहे.

रक्षा खडसे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांकडून भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावरदेखील टीका करण्यात आली होती. त्यावेळीही त्यांनी एकदाही राष्ट्रवादीला विरोध केला नाही. त्यामुळे भाजपने पुन्हा त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी सामूहिक राजीनामा देणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

राजीनामा देणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष सुनील काळे, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ, ओबीसी शहराध्यक्ष गोलू राणे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष आकाश निमकर, शहराध्यक्ष सुनील माळी, तालुका उपाध्यक्ष माला मेढे, शामराव धनगर, महिला शहर अध्यक्ष प्रणिता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस डॉ. सादिक शेख, जिल्हा उपाध्यक्ष हाजी फायुम, कायदे आघाडी सरचिटणीस अॅड. ए. जी. जंजाळे यांच्यासह २०५ जणांच्या सह्यांचे पत्र जे. पी. नड्डा यांच्याकडे पाठविण्यात आले आहे

Previous Post

तरुणीचे लग्नाचे फोटो एडिट करीत धमकी ; जळगावच्या तरूणा विरोधात गुन्हा !

Next Post

वाळू माफियांनी तहसील कार्यालयातून ट्रक पळविला

Next Post
वाळू माफियांनी तहसील कार्यालयातून ट्रक पळविला

वाळू माफियांनी तहसील कार्यालयातून ट्रक पळविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group